तेल्हारा(प्रतिनिधी)- दोन दिवसापूर्वी नारायण राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा तेल्हारा शिवसेने युवासेनेच्या वतिने गाढवावर धिंड काढून काळ्या पट्ट्या दाखवून पोलीस स्टेशनला निवेदन तक्रार देउन केला निषेध, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उठसूट बेताल वक्तव्याकरिता केंद्रात त्यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी मंत्रिपद देण्यात आले.
आजसंपूर्ण देश एका विशिष्ट परिस्थितीत कोरोना संकटाचा सामना करत असताना त्यास तोंड देताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामर्थ्यपणे तोंड देत आहेत. राज्यात आलेल्या सर्व संकटाना सामना करत देशात लोकप्रिय मुख्यमंत्रीच्या यादीत आपल स्थान पक्क केल आहे. मुख्यमंत्री यांची लोकप्रियता निर्माण झाली आहे.
हे विरोधीपक्ष भाजपला सहन होत नाही त्यामुळे खोटा जनार्धर मिळविण्यासाठी नारायण राणे यांनी जनाशीर्वाद यात्रा काढून जनतेमध्ये बेताल वक्तव्य करून सहानुभूती मिळत आहे. याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आपल्या मानसिक संतुलन ढळून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या टिकाकरिता हा एकमेव धंदा आहे. त्यांचे दोन्ही पुत्र ते करत आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झालं. याला कुठंतरी तोडीस तोड देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक भाजप नारायण राणे यांना धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर उतरणार.
त्याचाच एक भाग तेल्हारा येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या टावर चौक येथे नारायण राणेंची गध्यावर धिंड काढून तीव्र निषेध केला.
यावेळी शिवसेना तालुका समन्वयक प्रविण वैष्णव यांच्या सह शिवसेनेचे जि.प.सदस्य संजय अढाउ, सचिन थाटे, शंकरराव ताथोड, मा.शहर प्रमुख पप्पू शेठ सोनटक्के, उ.ता.प्रमुख अजय गावंडे, ज्ञानेश्वर आखरे, बाळासाहेब निमकर्डे, राम वाकोडे, युवा श. प्रमुख निलेश उमाळे, प्रज्वल मोहड, गोलू राउत, सूरज देशमुख, अंकुर बुरघाटे, वैभव देशमुख, वैभव गावंडे, किशोर डाबरे, श्याम महोरी, ओम आवारे, पंकज कवर, गौतम दामोदर, कैलास श्रीवास, गजानन मोरखडे, संभाजी वानखडे, विजय टेकाडे, अमित घोड़ेश्वर, अनिकेत आठोले, अक्षय गावंडे, नयन मोहड यांच्या सह आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते…