तेल्हारा(प्रतिनिधी)– राखीला आलेल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या भावाचा परत येतांना अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली याप्रकरणी अकोट पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तेल्हारा शहरातील मिलिंद नगर येथे राहणाऱ्या राजकुमार वाघ वय ३० वर्ष हा युवक राखीसाठी आपल्या घरी आलेल्या बहिणीला सासरी अकोट येथे सोडायला गेला होता. बहिणीला सोडल्यानंतर रात्रीला तेल्हारा येथे परत येत असताना लोहरी जवळील नागझरी नदीच्या पुलावरून दुचाकी क्रमांक एम एच ३० एपी १७३७ घेऊन जात असताना पुलावरून दुचाकी घेऊन पडून गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत रात्रभर तिथेच पडून होता.
मृतक राजकुमार हा रात्रीला घरी न आल्याने मृतकाच्या भावाने शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. आज सकाळी नागझरी नदीपात्रात अज्ञात इसम मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळाली असता सदर युवक हा तेल्हारा येथील असल्याचे स्पष्ट झाले. अकोट ग्रामीन पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. मृतकाच्या पश्चत पत्नी भाऊ आई वडील मुलगा असा आप्त परिवार आहे.
पुढील तपास ग्रामीण अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ मनोज कोलटकर,गोपाल जाधव हे करीत आहेत.