अकोला (सुनिल गाडगे): २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी महात्मा ज्योतिबा फुले नगर सिंधी कॅम्प अकोला येथील रहिवासी अभिषेक गवई वय अं. (२०) हा मोर्णानदीपात्रात बुडाल्याची माहिती अकोला तहसीलदार अरखराव साहेब यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.काल पासुन स्थानिकांनी शोध घेतला असता नदीतील डोहात २० फुट खोल पाणी असल्याने काहीच मिळुन आले नाही.
आज सकाळी लगेच जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार,ऋषीकेश राखोंडे, अंकुश सदाफळे,गोकुळ तायडे,आकाश बगाडे, संकेत देशमुख,आणी शोध व बचाव साहीत्यासह सकाळी आठ वाजता पोहचुन मोर्णानदीत सर्च ऑपरेशन चालु केले.
रेस्क्यु बोटच्या साहाय्याने सतत प्रयत्न केला परंतु डोह असल्याने त्यात १५ -२० फुट खोल पाणी असल्याने मृतदेह सापडत नव्हता यावेळी सकाळी आठ वाजता पासुन ते 12 वाजे पर्यंत सारखे अंडरवाॅटर सर्च ऑपरेशन चालुच ठेवले शेवटी तळाशी असलेल्या अभिषेक गवईचा मृतदेह जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी शोधुन वर आणलाच यावेळी तहसीलदार अरखराव साहेब,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब,खदान पो.स्टे.सनस साहेब आणी अग्निशमन दलाची टीम हजर होती,अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
तसेच मोर्णानदीतील केलेले थरारक अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन स्वता सनस साहेबांनी जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या सोबत अनुभवले यामुळे मानव सेवा सामाजिक आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी यांचा खदान पो.ठाण्याचे ठाणेदार सनस साहेब यांनी खदान पोलीस स्टेशन येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला