अकोला :- काटेपूर्णा प्रकल्प व पोपटखेड पूर नियंत्रण कक्ष यांनी दिलेल्या सूचना नुसार काटेपूर्णा प्रकल्पात मंजूर जलाशय परिचलन आराखड्यानुसार दिनांक 31/08/2021 पर्यंत प्रकल्पात 95% पाणी साठविण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काटेपूर्णा जलाशयामध्ये पाण्याची आवक लक्षात घेता जलाशयात 95% पाणी साठा पूर्ण झाले त्यानंतर येणारे पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
आज दि. २०/०८/२०२१ रोजी दुपारी १२.४५ वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण ५०.१६ घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे.याच अनुषंगाने काटेपूर्णा नदी काठावरील 77 गावातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. तसेच अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पाचे 2 गेट 10 से.मी. उघडून 5.56 क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे / कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
तरी नदी काठच्या गावातील नागरिकांना खबरदारीचा इशारा जिल्हा प्रशासन तसेच नैसर्गिक आपत्ती विभाग तर्फे देण्यात आला आहे, नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना व पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. सदरच्या काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासना तर्फे शोध व बचाव पथक कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली