• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

“ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल”ओबीसी प्रबोधन शिबिरात प्रा.हरी नरके यांचे प्रतिपादन

Team by Team
August 17, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
111 1
0
“ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल”ओबीसी प्रबोधन शिबिरात प्रा.हरी नरके यांचे प्रतिपादन
17
SHARES
798
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- ज्यांना आरक्षण मुक्त देश बनवायचा आहे ते ओबीसींचे कैवारी असल्याचे भासवत असताना आपण कुठवर बळी पडायचे याचा विचार करण्याची वेळ आली असून ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,लेखक प्रा.हरी नरके यांनी आपले विचार व्यक्त केले ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पश्चिम विदर्भ विभागीय प्रबोधन शिबिरात प्रा.नरके बोलत होते. संत तुकाराम चौकातील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित या शिबीराचे उदघाटन आ.अमोल मिटकरी यांच्या हस्ते, तर समता परिषद प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रसंगी रवि सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा.नरके यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, लेखक उत्तम कांबळे यांनी एक दिवसीय कार्यशाळेला विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

“ओबीसी आरक्षण आणि ना.छगन भुजबळ यांचे योगदान” यावर बोलताना प्रा.नरके यांनी राज्यातील ओबीसी आरक्षण लढे आणि संघर्षाचा आढावा घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली. वाशिमच्या विकास गवळी यांनी जिल्हा परिषद बाबत सुप्रीम कोर्टात याचिका टाकल्याने देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्यात जमा आहे. माध्यमांनी चुकीचे वार्तांकन करून लोकांचा संभ्रम वाढविला आहे ,सुप्रीम कोर्टाचे निकाल देशाला लागू असतात त्यामुळे आगामी काळात जसजशा पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्यात ओबीसी आरक्षण नसेल, केंद्र सरकार इंपेरिकल डेटा द्यायला तयार नाही,देवेंद्र फडणवीस पासून सगळे नेते म्हणतात केंद्राला डेटा मागण्याची गरज नाही ,भाजप मधील ओबीसी नेते ओबीसी समाजाची घोर फसवणूक का करीत आहेत असा सवाल प्रा. नरके यांनी केला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सकाळच्या सत्रात रावसाहेब कसबे यांनी देशातील ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकत ओबीसी समूहाची सांस्कृतिक फसवणूक वैदिक व्यवस्था आजही कशी करीत आहे. हे सांगितले, तर समारोप सत्रात ज्येष्ठ संपादक, लेखक उत्तम कांबळे यांनी शाहू महाराज आणि आरक्षण या विषयावर मांडणी करताना शाहू,फुले आंबेडकरांना समजून घेतल्याशिवाय आरक्षण समजू शकत नसल्याचे सांगितले. आरक्षण मागणे म्हणजे जाती अंताचा विचार स्वीकारणे होय, गुलामीच्या साखळ्या तोडण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे,”जो समाज प्रश्न जागे ठेवतो आणि त्याच्यासाठी लढत राहतो त्याची प्रगती होते” असे कांबळे म्हणाले.

सुप्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज, प्रा.डॉ. संतोष हुशे , हरिभाऊ भदे, बळीराम सिरस्कार, प्रा.तुकाराम बिडकर ओबीसी नेते विजय कौशल, विलास वखरे, अनिल शिंदे, गजानन वाघमारे, सुभाष सातव, गणेश खारकर, यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शिबिरासाठी विभागीय अध्यक्ष अरविंद गाभणे, विभागीय संघटक गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, प्रा. श्रीराम पालकर, विजय उजवणे, उमेश मसने, प्राचार्य किशन मेहरे, गजानन म्हैसने, ज्योती भवाने, कल्पना गवारगुरु, माया ईरतरकर, दीपमाला खाडे, सुष्मा कावरे, रामदास खंडारे, सपना राऊत, अनिल मालगे, बाळकृष्ण काळपांडे, नेहा राऊत, श्रीकृष्ण बोळे, सदानंद भुसकुटे, संजय तायडे, यांनी परिश्रम घेतले.

Tags: ओबीसी प्रबोधन शिबिरप्रा.हरी नरके
Previous Post

तालिबान्यांनी माझी हत्या करावी : पहिल्या महिला महापौर जरीफा गफारी

Next Post

करोना काळातही मिहानमध्ये गुंतवणूक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मिहानमध्ये गुंतवणूक

करोना काळातही मिहानमध्ये गुंतवणूक

rakshabandhan

विविध प्रकारच्या राख्यांनी सजली शहरातील बाजारपेठ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.