लॉर्ड्स: इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयानंतर भारताने जोरदार सेलिब्रेशन केलेचं. पण खरा जल्लोष मोहम्मद सिराजने (Siraj) केला असल्याचे पाहायला मिळाले.
भारताने दिलेल्या २७२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसनला शून्यावर बोल्ड केल्यानंतर सिराज (Siraj) कमालीचा खुश झाल्याचे पाहायला मिळाले.
अंडरसनची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद सिराज स्टम्प घेऊन पळाला. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महान क्रिकेटर कपिल देव यांचे सिराजने तोडले रेकाॅर्ड
इतकेच नव्हे तर सिराजने महान क्रिकेटर कपिल देव यांचे रेकाॅर्ड तोडले आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं ५ विकेट्स राखून विजय मिळवला होता.
त्यानंतर २०१४ नंतर महेंद्रसिंह धोनीच्या संघानं ९५ धावांनी विजय मिळवला होता. विराटच्या संघानं मिळवलेला विजय हा लॉर्ड्सवरील मोठा विजय ठरला.
सिराजने या सामन्यात १२६ धावा देताना ८ विकेट्स घेतल्या. त्यानं कपिल देव यांचा ८ बाद १६८ धावांचा विक्रम मोडला. आर पी सिंगनं ११७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या.
लॉर्ड्स टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये १-० ने आघाडी मिळवली. भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट आता २५ ऑगस्टपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे.
भारताने ठेवलेल्या २७२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के बसले. शून्य रनवर इंग्लंडचे दोन्ही ओपनर रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली आऊट झाले.
यानंतर जो रूटने हसीब हमीदसोबत इंग्लंडची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, पण इशांत शर्माने पहिले हमीद आणि मग जॉनी बेयरस्टोला आऊट केलं.
अखेरच्या सत्रामध्ये भारताला विजयासाठी ६ विकेटची गरज होती. भारताने या सगळ्या ६ विकेट घेत दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला ३, इशांत शर्माला २ आणि मोहम्मद शमीला १ विकेट मिळाली.