अकोला (प्रती): आज महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अकोला जिल्हा च्या वतीने कार्यकारिणी नुुकतीच जाहीर करण्यात आली.सदर कार्यकारणी रुग्णसेवक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रवीणजी भोटकर यांच्या आदेशा नुसार जाहीर करण्यात आली. सामाजिक कार्येकर्ते उमेश इंगळे नेहमी रुग्नानं साठी झटत असतात व समाजसेवा मध्ये त्यांना आवड आहे. यांच्या माध्यमातून गरजू रुग्नांणा ब्लड मिळून देणे, व रुग्णसेवा विषयी तळमळ हे पाहून उमेश इंगळे यांनां अकोला जिल्हा च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जयवंत नाईकुडे सर जिल्हा नर्सिंग स्कूल कॉलेजेस चे अध्यक्ष, साई मोटर ड्राइविंग स्कूल चे संस्थपक अध्यक्ष विजय वानखडे, डॉ मनोहर घुगे, जिल्हाध्यक्ष आशीष सावळे आदि मान्यवर यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना चे जिल्हाध्यक्ष आशीष सावळे यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.