अकोला: दि.१३ जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यासाठी लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
वाटप परिमाण व दर याप्रमाणे-
१. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी (गहू/मका/ज्वारी) तीन किलो प्रतिव्यक्ती रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत योजनेअंतर्गत तहसिल कार्यालयात खरेदी करण्यात आलेल्या मका व ज्वारीचे तहसिलदार/ अन्न वितरण अधिकारी यांनी निश्चित केलेल्या वाटप परिमाणानुसार प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना त्याच प्रमाणात गव्हाचे नियतन कमी करुन मका व ज्वारीचे वाटप करण्यात यावे. दर गहू दोन रुपये प्रतिकिलो/ मका/ज्वारी एक रुपया प्रतिकिलो.
२. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.
३. अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो प्रतिकार्ड, दोन रुपये प्रतिकिलो.
४. अंत्योदय अन्न योजना तांदूळ-२० किलो प्रतिकार्ड, तीन रुपये प्रति किलो.
५. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रतिव्यक्ती, दोन रुपये प्रतिकिलो.
६. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.
७. नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रतिशिधापत्रिका, २० रुपये प्रतिकिलो.
८. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)
९. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)
हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.