अकोला– दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबत भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कार्यक्रम अकोला जिल्ह्यात राबविला जाणार आहे.
पुर्व – पुनरिक्षण उपक्रम
१.दुबार / समान नोंदी , एकापेक्षा अधिक नोंदी, तार्कीक त्रुटी दुर करणे इ., मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारा घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी., योग्यप्रकारे विभाग / भाग तयार करणे, आणि मतदान केंदाचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे- (कालावधी-दि. ९ऑगस्ट,सोमवार ते दि. ३१ऑक्टोबर२०२१ रविवार.)
पुनरिक्षण कार्यक्रम
२. एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे- सोमवार दि. १ नोव्हेंबर२०२१.
३. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- सोमवार दि. १ नोव्हेंबर ते मंगळवार दि.३० नोव्हेंबर २०२१.
४. विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दिवस
५. दावे व हरकती निकालात काढणे- सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ पर्यंत.
६. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- बुधवार,दि.५जानेवारी २०२२.
या कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन द्यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित,मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत घेण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.