अकोला– आज दि.११ दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३४६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३४३ अहवाल निगेटीव्ह तर तीन अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.१०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९५(४३२०३+१४४१५+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज दि.११ एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह तीन.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०८५१५ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०४९६४ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१५४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०८४७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६५२६६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
तीन पॉझिटिव्ह
आज दि.११ दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुष रुग्णांचा समावेश असून ते तिघेही अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे. दरम्यान काल (दि.१०) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.
पाच जणांना डिस्चार्ज
आज दि.११ दिवसभरात होम आयसोलेशन मधील पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
४७ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९५(४३२०३+१४४१५+१७७) आहे. त्यात ११३४ मृत झाले आहेत. तर ५६६१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.