नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी (Gold Price Today) खूशखबर आहे. सोन्याचे दर गेल्या चार महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर 46,000 रुपये प्रति तोळापेक्षा कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तरावर आहेत. एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर जवळपास 1.3 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या दरम्यान चांदीचे दरही (Silver Price Today) 1.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
आज बुधवारी सोन्याचे दर (Gold price) कमी झाले आहेत. MCX वर आज सकाळी सोन्याचे दर 0.13 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीचे दर आज मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 176 रुपयांनी कमी झाले आहेत, यानंतर दर 45,110 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर (Silver Price) 898 रुपये प्रति किलोने कमी होऊन 61,715 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,735 डॉलर प्रति औंस असून चांदीचे दर 23.56 डॉलर प्रति औंस होते.
11000 रुपयांनी स्वस्त आहेत सोन्याचे दर
सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा 11000 रुपयांनी स्वस्त आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. सध्या सोन्याचे दर सराफा बाजारात 45,000 रुपये प्रति तोळाच्या आसपास आहेत. याचा अर्थ सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा कालावधी चांगला आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. वर्षाअखेरपर्यंत गुंतवणूकदारांना सोन्यातून चांगला रिटर्न मिळेल असा अंदाज आहे.
गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला होता. त्याआधीच्या वर्षी सोन्याने 25 टक्के रिटर्न दिला होता. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोनं एक सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. तुम्हाला यातून चांगला रिटर्न मिळेल.
महत्त्वाच्या शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज दिल्लीमध्ये सोन्याचे दर 45,500 रुपये प्रति तोळा आहेत. मुंबईमध्ये दर प्रति तोळा 45,280 रुपये रुपये असून चेन्नईमध्ये 43,730 रुपये आहेत.