अकोला– आदिवासी विकास विभागाकडून अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी तसेच पदव्युतर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या अंतर्गत राज्यातून दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीसाठी बुधवार दि. २५ ऑगस्ट पर्यत अर्ज करावे. विहित नमुन्यातील अर्ज, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला येथे उपलब्ध असून अर्जाकरीता आवश्यक असलेली पात्रता, अटीशर्ती याबाबतची माहिती एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प, कार्यालय येथे फलकावर लावण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांने अर्ज करण्याचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.