तेल्हारा :- निकृष्ट दर्जाचे शिळे शिवभोजन देणाऱ्या तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिव भोजन केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी शिवसेना व युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांच्या कड़े ६ ऑगस्टला निवेदन देवून करण्यात आली.
महाराष्ट्र सरकार द्वारे गोरगरीब गरजूवंताचा सोयी साठी शिव भोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे . तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन विश्राम गृहाजवळ तेल्हारा प्रो प्रा प्रमोद भटकर यांचे शिवभोजन असून यांच्या कडील शिवभोजन केंद्रावर भोजन अत्यंत निकुष्ठ दर्जाचे असल्याबाबत तक्रारी नागरिकांकडून लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. 5 ऑगस्ट रोजी लाभार्थी शिवाजी गजानन फोकमारे शिवभोजन घेतलें असता सदर भोजन हे शिळे दिले आहे याबाबत रीतसर लेखी तक्रार यांनी केली आहे सदर प्रकरणाची दखल घेत तेल्हारा तहसीलदार यांना रीतसर तक्रार सुद्धा करण्यात आली आहे याबाबत तहसील कार्यालय मार्फत पंचनामा झाला असून सदर पंचनामा नुसार शिवाजी फोकमारे सह लाभार्थ्यांना य दिलेले शिवभोजन शिळे व निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर शिवभोजन केंद्र चालक याचे याच ठिकाणी मेस असून या मेस मधील उरलेले अन्न शिवभोजन मध्ये दिल्या जात असल्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असून असल्याने याबाबत आपण त्वरित शिवभोजन केंद्र परवाना रद्द करण्यात यावा असे निवेदन शिवसेना व युवा सेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संजय अढ़ाऊ ,युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा सचिन थाटे , शिवसेना तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव , माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के , किशोर डामरे , संजय लांडे , रोहित अग्रवाल आदि उपस्थित होते .
( सदर शिवभोजन केंद्र बाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या शिवभोजन केंद्राची मान्यता तत्काळ रद्द करण्यात येईल
– काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला)