• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया सेलच्या प्रवाहात सामिल व्हा :एस.एम.देशमुख

Team by Team
August 6, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
90 1
0
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया सेलच्या प्रवाहात सामिल व्हा :एस.एम.देशमुख
14
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई- सांप्रतच्या काळात सोशल मिडियाचं महत्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही.. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे.. त्यामुळंच मोठयातलं मोठं चॅनल देखील आमच्या यु ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत आहे. सोशल मिडियाचा वापर आणि युट्यूब चॅनलला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता पुढील काळ युट्यूब आणि पोर्टलचा आहे हे स्पष्ट आहे. काळाची पाऊलं ओळखून नव्या पिढीतील पत्रकार मोठ्या संख्येनं नव्या व्यासपीठाचा वापर करताना दिसत आहेत..

नवीन माध्यम समोर येत असतानाच या माध्यमातील पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न देखील समोर येत आहेत.. व्यक्तीगत पातळीवर एकटा पत्रकार या समस्यांचा मुकाबला करू शकत नाही अथवा आव्हानांना सामोरं जाऊ शकत नाही.. संघटीतपणेच नव्या माध्यमातील आव्हानांना सामोरं जाता यावं यासाठीच आम्ही “महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद” ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू केली आहे.. परिषदेच्या नव्या व्यवस्थेच्या माध्यमातून युट्यूब आणि पोर्टल चालवणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.. म्हणूनच सोशल मिडियातील जास्तीत जास्त पत्रकारांनी महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेचा हिस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सिध्द व्हावे ही विनंती..

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची सर्वात जुनी अशी संस्था आहे.. परिषदेने गेल्या 82 वर्षात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना, बाळशास्त्री जांभेकर स्मारकासह पत्रकारांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले आहेत.. परिषदेने जे प्रश्न हाती घेतले ते चिवटपणे लढा देत सोडविले आहेत.. सोशल मिडिया परिषद देखील याच जिद्दीने काम करणार आहे.सोशल मिडिया परिषदेच्या शाखा सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येत आहेत.अगोदर जिल्ह्याची टीम निवडली जाईल त्यानंतर ही जिल्ह्याची टीम तालुका शाखा स्थापन करील.. हे काम युध्द पातळीवर सुरू आहे.. सोशल मिडिया परिषद ही मराठी पत्रकार परिषदेचीच एक शाखा असल्याने जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषद परस्पर पूरक आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहेत..
सोशल मिडिया परिषदेचे राज्य निमंत्रक म्हणून बापुसाहेब गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोशल मिडियातील ज्यांना परिषदेच्या नव्या प्रवाहात सहभागी व्हायचं आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.

शरद पाबळे
9822083111
बापुसाहेब गोरे
9822222772
निलेश जवकार
9922390308(अकोला जिल्हा)
एस.एम.देशमुख
किरण नाईक
मराठी पत्रकार परिषद, मुंबई

Tags: एस.एम.देशमुख
Previous Post

View Once नावाचं व्हाॅट्सअ‍ॅपचं भन्नाट फिचर वापरलं का?

Next Post

अकोल्यात प्रशिक्षणाच्या नावाखाली युवतीचे शारीरिक शोषण,आरोपीला अटक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अजबच !! जेलमध्ये सुरू केला ‘बिजनेस’; Paytm वर पेमेंट आणि थेट तुरुंवात डिलिव्हरी

अकोल्यात प्रशिक्षणाच्या नावाखाली युवतीचे शारीरिक शोषण,आरोपीला अटक

तेल्हाऱ्यात शिवभोजन केंद्रावर निकृष्ट शिळे जेवण,तहसीलदारांनी केला पंचनामा

तेल्हाऱ्यात शिवभोजन केंद्रावर निकृष्ट शिळे जेवण,तहसीलदारांनी केला पंचनामा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.