अकोला (डॉ चांद शेख)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन रविवार दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगीक न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते.
अकोला जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबीत प्रकरणापैकी एकुण ११, २१० प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आली होती. एकुण २,४९९ प्रकरणामध्ये समेट घडून आला. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वहाण अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय. अॅक्ट अशा प्रकरणात तडजोड होउन रक्कम रुपये ८,००,०४,२७१ ( रूपये आठ कोठी चार हजार दोनसे एकाहत्तर फक्त ) वसुल झाली.लोक न्यायालय यशस्वी होणेकरीता श्री वाय . जी . खोब्रागडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अकोला यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री स्वरूप बोस व सर्व न्यायिक अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
लोकन्यायालयामध्ये न्यायाधीश सर्वश्री एच. के. भालेराव, जिल्हा न्यायाधिश – २ अकोला, ए. के. शर्मा, जिल्हा न्यायाधिश -५, के.बी. चौगुले, २ रे सह दि .न्या .व. स्तर, श्रीमती एस .एम.बनसोड, सह दि.न्या. क . स्तर, यु. एस.जाधव -५ वे सह दि.न्या.क.स्तर, श्रीमती एम. व्हि. भराडे, ३ रे सह दि.न्या. क. स्तर, श्रीमती एस.एच. राठी, ४थे सह दि.न्या.क. स्तर, श्री ए .एस. अग्रवाल,६ वे सह दि. न्या . क. स्तर, श्री यु .पी. हिंमगिरे, ८वे सह दि. न्या.क. स्तर, श्रीमती एस .के. चौधरी, ४थे सह दि. न्या.व. स्तर, तसेच पॅनल अधिक्क्ता अॅड.एस. डोंगरदिवे, अॅड. कु .ए.डी. गोपनारायण, अॅड. बी .के. सावळे, अॅड. एस. मालपाणी, अॅड. एस.एस. इंगळे, अॅड. दिप्ती बोराणी, अॅड. वाय.डी. दांदळे, अॅड एस .बी. देशमुख, अॅड. आरती यादव, अॅड. व्हि. बी .सरकटे, अॅड. टि. एस. सिरशाट, पॅनल सामाजीक कार्यकर्ते म्हणुन विक्रम शर्मा, डॉ. शेख चांद, मो . रशिद, रवी मीटकरी, देवेंद्र इंगळे, गणेश अरखराव, पि .एस. खाडे, शाहनवाज खान इत्यादींनी काम पाहीले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहुन सर्वांनी कोरोना संबंधीचे शासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले, यावेळी सर्व परिसर निरजंतुकरण करण्यात आले होते.जिल्हा न्यायालय अकोलाचे प्रबंधक श्री ए .एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री सुनिल पाटील, श्रीहरी टाकळीकर, व. लिपीक, राजेश देशमुख , कुणाल पांडे, कनिष्ठ लिपीक, मो. शरीफ आणि शाहबाज खान, शिपाई व इतर न्यायिक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले