अकोला– कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत जिल्ह्यातील युवक-युवतीना मत्स्य व्यवसाय व रेशीम उद्योग तसेच कृषी संबधीत व्यवसाय व नाविन्यता या विषयावर शुक्रवार दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहयोगी प्राध्यापक तथा मत्स्यशास्त्रज्ञ (मत्स्यसवंर्धन व शोभीवंत मत्स्यपालन विषयतज्ञ) जि.सिंधदुर्ग डॉ. नितिन सावंत, रेशीम प्राणिशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर समन्वयक अधिकराव धनाजी जाधव, आकाश अग्रो. फार्म प्रोड्यूसर व डायरेक्टर फायनांन्स इन्फास्ट्रक्चर आकाश अॅग्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाशचंद्र गौरव मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छूक युवक-युवतींनी ऑनलाईन युटयूब maha_sdeed व फेसबुक वर लाईव्ह /Maha Sdeed ऑनलाईन सहभागी होता येईल. तसेच या सत्रात काही प्रश्न असल्यास दुपारी साडेचार ते पाच दरम्यान प्रश्नोत्तराव्दारे निराकरण करण्यात येईल.