• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पत्रकारांच्या विधायक कामाने पत्रकारांविषयी समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन

City Reporter by City Reporter
August 4, 2021
in अकोला, राज्य
Reading Time: 1 min read
98 1
0
पत्रकारांच्या विधायक कामाने पत्रकारांविषयी समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
19
SHARES
708
VIEWS
FBWhatsappTelegram

धुळे- ‘‘समाजामध्ये काही प्रमाणात पत्रकारांप्रती प्रतिकुल भावना व कपाळावर आठी दिसू दिसून येते. परंतु बीड, रोहा, रायगड, रत्नागिरीसह अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या राज्यातील काही जिल्हा पत्रकार संघांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना केलेली तातडीची मदत ही अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब असून अशा कामाने पत्रकारांप्रती समाजाच्या दृष्टीकोनात बदल व मतपरिवर्तन होण्यास मदतच होईल’’ असे प्रतिपादन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या महत्वपूर्ण ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.

दीड तास चाललेल्या या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील प्रसिद्धीप्रमुख सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन करतांना एस.एम.देशमुख पुढे म्हणाले, 82 वर्षाची परंपरा असलेली मराठी पत्रकार परिषदेने नेमलेले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे असून दिवसातून काही मिनिटे परिषदेला द्या, आपण पाठविलेली बातमी छापून आली नाही म्हणून खचून जावू नका, बातमी पाठवित रहा, प्रसारमाध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेऊन संपर्कात रहा व त्यांना पत्रकारांसाठी करीत असलेल्या परिषदेच्या कामाची माहिती देऊन भूमिका समजावून सांगा. आपले काम लेटर पॅड, व्हिजीटींग कार्ड यापूरते मर्यादित न ठेवता विधायक कामात सक्रिय राहून एका जिल्ह्याचे काम दूसऱ्या जिल्ह्यात कळेल या दृष्टीने कार्यरत रहावे असे आवाहन करीत लवकरच 36 जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना ओळखपत्र प्रदान करण्यात येतील व येत्या 3 डिसेंबर रोजी उत्कृष्ठ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखाची निवड करण्यात येईल अशी घोषणा एस.एम.देशमुख यांनी समारोप प्रसंगी केली.

परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रसिद्धी प्रमुखांनी प्रत्येक तालुक्याशी सतत संपर्कात रहावे. जनसंपर्क म्हणून काम करावे. परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करतांना आपण सतत यशस्वी ठरलो आहोत. पुरपरिस्थितीबाबत परिषदेने केलेले कामाचे राज्यभर कौतुक झाले व परिषदेचा दराराही वाढला. आपण केलेल्या चांगल्या कामाची प्रसिद्धीबाबत कुठेही कमी पडता काम नये असे शेवटी किरण नाईक यांनी आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक मार्गदर्शन करतांना म्हणाले, परिषदेच्या प्रतिमेचा प्रभाव शासनावर पडला पाहिजे. पत्रकार हे समाज प्रबोधनाबरोबरच पुरग्रस्तांना मदत करून समाजकार्यातही अग्रेसर असतात हे आपण दाखवून दिले आहे. आपले शिस्तबद्ध काम वृत्तपत्रातून प्रकाशित व्हावे यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. विशेष म्हणजे या बैठकीत परिषदेचे सर्व नेते व काही जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी आपल्या भाषणात खान्देशातील वृत्तपत्र, पोर्टल, व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर परिषदेच्या वृत्तांना मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल, परिषदेच्या वृत्तांना प्राधान्य देणाऱ्या खान्देशच्या पत्रसृष्टीचे कौतुक केले. या बैठकीत सर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या अडचणी व शंकांचे परिषदेच्या नेत्यांनी निराकरण केले. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा प्रमुखांना केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. बैठकीचे संचलन करीत शरद पाबळे यांनी आभार मानले.

Previous Post

शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

Next Post

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये चार दशकानंतर जिंकले कांस्यपदक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये चार दशकानंतर जिंकले कांस्यपदक

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये चार दशकानंतर जिंकले कांस्यपदक

suicide death

कोरोनाच्या भीतीने वडिलांचा मृतदेह ३ दिवस घरात; मुलीची आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.