अकोला(प्रतिनिधी)- मूर्तिजापूर तालुक्यातील शेंद ते कानडी रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती असून विद्यार्थ्यांसह नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मरणयातना भोगत आहेत.
तालुक्यातील ग्राम शेंद येथिल नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मरणयातना भोगाव्या लागत असून शेंद ते कानडी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून पावसाळ्याच्या दिवसात वाहन तर सोडा पायी जाणे सुद्धा कठीण झाले आहे कारण पाच किलोमीटरच्या ह्या रस्त्यावर चिखल च चिखल असल्याने शाळकरी विद्यार्थांना शिक्षणासाठी या चिखलातून मार्ग काढून आपले शिक्षण घ्यावे लागत आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी होत असून मात्र प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही तर लोकप्रतिनिधी सुद्धा या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत.त्वरित हा रस्ता व्हावा अशी शेंद कानडी येथील नागरिकांची मागणी आहे.