• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप

Team by Team
July 29, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
136 1
0
पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप
41
SHARES
982
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पनोरी ता.अकोट येथील दिवंगत मुरलीधर आनंदा बुटे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली.

मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. आज पालकमंत्री ना.कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केले. बुटे यांचा मुलगा महेश व मुलगी वैष्णवी असे दोघेच वारस आहेत. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांनी सुपूर्द केला. या कुटुंबाला अन्य योजनांमधून मदत मिळवून देऊ,तसेच त्यांचे घराचे पुर्णतः नुकसान झाले असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ. शिवाय मुलगा महेश याला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वस्त केले. पनोरी गावच्या नाल्याचे खोलीकरण, तसेच गावच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येतील,असेही ना.कडू यांनी सांगितले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यावेळी पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार निलेश मडके, गट विकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

पूरग्रस्त गावांनजीक नाल्यांचे खोलीकरण प्राधान्याने

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना ना.कडू म्हणाले की, जिल्ह्यात जिथे जिथे नाल्याचे पाणी गावात शिरून पुरामुळे नुकसान झाले तेथे नाला खोलीकरण काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राधान्याने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण

राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट तालुक्यात ग्रामपंचायत इमारतीचे भुमिपूजन, ग्रामपंचायत व व्यायामशाळा इमारतींचे लोकार्पण करण्यात आले.

अकोट तालुक्यातील ग्रा.पं. तरोडा येथे ग्रामपंचायत सभागृह भुमिपूजन ना. कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर लोतखेड येथे ग्रामपंचायत भवन इमारत व  व्यायामशाळा लोकार्पण  हे कार्यक्रमही ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोतखेड येथे दिव्यांग व्यक्तिंचे अनुदानाचे धनादेश तसेच शिधापत्रिकांचे वाटप ही  पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Tags: bacchu kadu
Previous Post

आसेगाव बाजार येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किट व मदत अनुदान वाटप

Next Post

“वाघ वाचवा” जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
“वाघ वाचवा” जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

"वाघ वाचवा" जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.