तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील ग्राम इसापूर येथील नागझरी नदीपात्रातील वाळू वाहतूक जोरात सुरू आहे या वाळू वाहतुकीमुळे ईसापुर गावातील रस्ते खराब होत असून वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून गावामध्ये एखादा अपघात किंवा अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या वाळू वाहतूक करणाऱ्या वर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी जेणेकरून ही अवैद्य वाहतूक बंद होईल इसापूर येथील नदीतून अवैद्य वाळू वाहतूक सुरू असून आळा घालावा अशा प्रकारचे पत्र ग्रामपंचायत इसापूर यांनी तहसीलदार साहेब तेल्हारा यांना दिले आहे
_______
ग्रामपंचायत इसापूरच्या वतीने तहसीलदार डॉ. संतोष येवलिकर यांना लेखी पत्राद्वारे महीती दिली आहे अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्यावर प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली
सौ.मीराताई आनंद बोदडे
सरपंच ग्रामपंचायत इसापूर