तेल्हारा(प्रतिनिधी)- स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात तृतीय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.गजाननराव पुंडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, पदवी प्राप्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी कौशल्य विकसित केले पाहिजेत. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केशवराव मेतकर कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, अण्णासाहेब ढोले माजी प्राचार्य तथा आजीवन सदस्य उपस्थित तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेश दादा खोटरे आजिवन सदस्य, ॲड.विश्वासराव नेरकर आजीवन सदस्य प्रा.भैय्यासाहेब देशमुख, सुधीर देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी केले.
यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ९ वे स्थान प्राप्त केल्याबद्दल राज्यशास्त्र विषयाचा विद्यार्थी अविनाश आनंदा सोनवणे या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील बी.ए. बी.कॉम. बी.एससी.एम.ए.व एम.कॉम. च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. कृष्णा माहुरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. गोपाल जोंधळेकर यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता प्रा. स्वप्निल फोकमारे यांनी म्हटलेल्या राष्ट्रवंदनेने झाली. कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एम.पी. चोपडे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.गजानन इंगळे, प्रा. रमेश लोणकर प्रा.कु.एस.जे.फरसोले, प्रा. डॉ. धीरज नजान, प्रा. डॉ.रजनी बोबडे, प्रा. तुरे, प्रा.योगेश कोरपे, प्रा. प्रशांत गेबड, प्रा.सुरेश झामरे आदी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश देवतळे सचिन ढोले हिम्मत फोकमारे अमोल गेबड यांनी परिश्रम घेतले. या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले