अकोट(राजकुमार वानखडे) : दिनांक 22 जुलै गुरुवार रोजी अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे,माननीय नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, विधान परिषद चे आमदार आ.अमोल दादा मिटकरी, जिल्हाध्यक्ष उज्वलाताई राऊत, प्र. सरचिटणीस छायाताई कात्रे यांच्या मार्गदर्शनात अकोट तालुक्यातील कुटासा गावामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर,”आरोग्यम् धनसंपदा” कार्यक्रम संपन्न झाला.आरोग्य हीच खरी संपत्ती,जो माणूस आरोग्याने चांगला असतो, तो मनाने चांगला असतो,जो मनाने चांगला असतो,तोच बुद्धीने चांगला असतो, म्हणून सर्वजण निरोगी राहायला हवेत यासाठी,आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खास महिला डॉक्टरांची ची टीम बोलवण्यात आली होती.
1) गर्भ पिशवी कॅन्सर समस्या
2) डोळ्यांचे विकार
3) शुगरचे विकार
4) स्त्री रोग तज्ञ. यासह अनेक समस्या चे निराकरण तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यात आले.
शिबिराचे आयोजक महिला तालुका अध्यक्ष सौ शारदा कैलास थोटे यांच्या नेतृत्वामध्ये कुटासा गावामधील दोनशेच्यावर महिलांनी आपली तपासणी करून शिबिरामध्ये नोंद केली. यावेळी तालुक्यातून आलेल्या 5 महिला डॉक्टरर्स यांनी अत्यंत चांगली सेवा दिली. यावेळी आमदार अमोल दादा मिटकरी यांनी आपल्या स्थानिक निधीतून दिव्यांगासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्यात.व काही महिलांचा पक्ष प्रवेश करून घेतला.
यावेळी कुटासा येथील सरपंच अनंतराव लाखे,डॉ. आशा ताई मिरगे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य , जिल्हाध्यक्ष उज्वला ताई राऊत, प्रदेश सरचिटणीस छायाताई कात्रे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सुषमाताई कावरे, जिल्हा उपाध्यक्ष वृंदाताई मंगळे, अकोट शहर अध्यक्ष चारुलता ताई थेटे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत साबळे, युवक ता.अध्यक्ष राम मैसणे,ता. उपाध्यक्ष माया ताई दहीभात, शहर उपाध्यक्ष आशाताई गावंडे, शाम भाऊ राऊत, कैलास थोटे, हरिदास दहिभात, तालुका वैद्यकीय अधिकारी तोरणेकर साहेब यांचे विशेष आभार ज्यांनी महिला डॉक्टर टीम उपलब्ध करून दिली. व शाम भाऊ राऊत व डॉक्टर निलेश वानखडे यांचे सहकार्या बद्दल विशेष आभार व कुटासा येथील महिला भगिनी यांनी आपल्या समस्या डॉक्टरांसमोर मांडून आपल्या समस्येचे निराकरण केले करिता विशेष आभार.