• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Akola Flood: ३३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले.

Team by Team
July 24, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
120 1
0
flood farm akola
18
SHARES
864
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार, २३ जुलै रोजी शासनाकडे पाठविण्यात आला.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, त्यामध्ये अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार अकोला, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीसह शेतजमिनीचे नुकसान तसेच घरांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय असे आहे पिकांचे नुकसान…

तालुका             क्षेत्र ( हेक्टर)

अकोला             १९०७९

बार्शिटाकळी       १८५०

अकोट               १५०

तेल्हारा              ३००

बाळापूर            १२२४६

मूर्तिजापूर           १७३

…………………………………………….

एकूण             ३३७९८

३३४ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३४ मोठ्या व लहान दुधाळ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, पशुपालकांच्या मदतीसाठी १४ लाख १५ हजार ९५० रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचेही प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

३३० गावांतील ३७८३ कुटुंबे बाधित

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३३० गावांतील ३ हजार ७८३ कुटुंबे बाधित झाली असून, २५९ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेे आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अतिवृष्टी पुरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

– संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

Tags: Akola floodakola news
Previous Post

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Next Post

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाच्या काळात ४२ तक्रारी!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
बायकोकडून होतोय छळ; कोरोनाच्या काळात ४२ तक्रारी!

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाच्या काळात ४२ तक्रारी!

Mahavitaran Akola

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा महावितरणला फटका,दुरूस्तीसाठी महावितरणचे युध्दस्तरावर प्रयत्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.