अकोला – जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरात व ग्रामीण भागात नदी नाल्यांना पुर आलामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरुन मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पाऊस सातत्याने सूरु असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. अतिवृष्टी व पुरपरिस्थिती पाहता व विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.