अकोला(प्रतिनिधी)- अकोल्यातील स्थानिक सिटी कोतवाली पोलीस ठाण्या अंतर्गत मोर्ना नदीे पुलाखाली एका अनोळखी 25 ते 30 वर्ष वयाच्या युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून मोरणा नदीला आलेल्या पुरात सदर प्रेत वाहत आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कायटे ह्या करीत आहेत.