अकोला (प्रतीनिधी)- अकोला जिल्ह्यातील अकोला शहरापासून वाडेगाव हे शहर ३० किलोमीटर अंतर आहे हा रस्ता गेल्या बऱ्याच वर्षापासून मोठमोठे खड्डे पडून खराब झालेला असल्याने या रस्त्यावर आतापर्यंत अपघात होऊन शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षापासून या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे अजून पर्यंत हा रस्ता बनला नाही, या रस्त्यावर बरेचसे शाळा, महाविद्यालय खेडे गांव आहेत ग्रामिण भागातील बरेच विद्यार्थी या रस्त्याने शाळा,महाविद्यालयात ये – जा करतात, शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामकाज करिता अकोला ते वाडेगांव ये जा करतात तरी आपण भारतभर रस्त्याचे जाळे जोडत आहात सर्व मोठे शहरे रस्तेद्वारे एकमेकांना जोडत आहात त्याचाच एक भाग म्हणून अकोला ते वाडेगांव हा काही राष्ट्रीय महामार्ग किंवा खूप मोठा राजमार्ग नाही आहे फक्त ३० किलोमीटरचा हा रस्ता असून नव्याने डांबरीकरण करावे, या रस्त्यासाठी मी आणी बऱ्याच लोकांनी वारंवार निवेदने दिली आंदोलने केली तरीही आतापर्यंत हा रस्ता बनला नाही त्यामुळे कृपया आपण लक्ष देऊन हा तीस किलोमिटरचा रस्ता नव्याने तयार करण्यात यावा ही नम्र विनंती अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रस्ते वाहतूक आणी महामार्ग मंत्रालय यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे