तेल्हारा(आनंद बोदडे) विपश्यना चॅरिटेबल ट्रस्ट शेगाव अंतर्गत खापरखेड फाटा येथील धम्माअनानूकूल केंद्र येथे रविवारी दिनांक 18 जुलै रोजी पॅगोडा निर्मितीसाठी भिक्खू संघाच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी अनेक जुन्या साधकांची उपस्थिती होती हा पॅगोडा प्रथम नागपूर व त्यानंतर तालुक्यात होत आहे हे विशेष धम्म अनानुकूल विपश्यना केंद्रामध्ये सहा एकराच्या परिसरात दर महा दहा दिवसीय शिबिर आयोजित करण्यात येत असतात मात्र येथे पॅगोडा नव्हता त्याकरता येथील ट्रस्टी व जुन्या साधकांनी पुढाकार घेत पॅगोडा उभारण्याचा निर्णय घेतला यापूर्वी येथे 07 जुलै 18 जुलै पर्यंत भिक्षू संघाच्या दहा दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिर समापना नंतर भिक्षु संघाचे हस्ते पॅगोडा निर्मितीसाठी भूमिपूजन करण्यात आले याला अंदाजे दोन कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे याकरता जुन्या साधकांकडून दाणाच्या स्वरूपात आलेल्या निधीवरच हा पॅगोडा दोन वर्षात पूर्णत्वास नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला
_______
मध्ये 104 साधक करू शकतील साधना
यामध्ये एकाच वेळी 104 साधक साधना करू शकतील तसेच पॅगोडा हा दुमजली असणार आहे यापूर्वी अशा प्रकारचा पॅगोडा विदर्भात नागपूर येथे धम्म नागा विपश्यना केंद्र माहुर झरी येथे असून त्यानंतर तेल्हारा तालुक्यात होत आहेत यामुळे विपश्यना साधकांसाठी ही आनंदाची बाब असून तालुक्याच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे