• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

धक्कादायक! ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्…

Murder in Gondia: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Team by Team
July 21, 2021
in गुन्हा, विदर्भ
Reading Time: 1 min read
192 2
0
Murder
47
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

गोंदिया: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येच्या घटनेनंतर, पोलिसांनी एक महिन्यानं खूनाची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चिचगड पोलीस करत आहेत.

खरंतर, 23 जून रोजी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासगड याठिकाणी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पण संबंधित तरुणी नेमकी कोण आणि तिची हत्या कोणी केलं, याच गूढ बनलं होतं. पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तपास करत प्रियकरासह दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

समीर असलम शेख (वय 26, बावलानगर बुटीबोरी) असं अटक केलेल्या प्रियकर तरुणाचं नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25) असं अटक केलेल्या अन्य दोन तरुणांची नावं आहे. आरोपी समीर हा मागील काही काळापासून मृत तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. दरम्यान मृत तरुणीनं समीरकडे लग्नाचा तगादा लावला. पण समीरला लग्न करायचं नव्हतं.

असा काढला काटा…

प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं संतापलेल्या समीरनं प्रेयसीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्यानं मित्र आसिफ आणि प्रफुल या दोघांशी संगनमत केलं. यानंतर आरोपी प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं प्रेयसीला ढासगड येथील जंगलात नेलं. याठिकाणी आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात ओढून नेऊन टाकला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: crime newsMurder
Previous Post

बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल

Next Post

स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त, :अस्थायी समिती नियुक्त,अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त, :अस्थायी समिती नियुक्त,अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.