अकोला– जिल्ह्यातील एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी मासिक नियतन माहे जुलै ते सप्टेंबर 2021 करीता गहु 7770 क्विंटल व तांदुळ 1940 क्विंटल शासनाकडून मंजुर झाले असून ते पुढील प्रमाणे.
अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 285 क्वि. तर तांदुळाचा 71 क्वि., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1251 क्वि. तर तांदुळाचा 313 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 536 क्वि. तर तांदुळाचा 134 क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1919 क्वि. तर तांदुळाचा 479 क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1206 क्वि. तर तांदुळाचा 301 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 686 क्वि. तर तांदुळाचा 171 क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 585 क्वि. तर तांदुळाचा 146 क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1302 क्वि. तर तांदुळाचा 325 क्वि., असे एकूण गहूचे 7770 क्विंटल तर तांदुळाचे 1940 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे.