अकोला– भारतीय स्टेट बॅंकेने नवीन सीएमपी फास्ट प्लस प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली व्दारे माहे ऑगस्ट-2021 पासुन देयकांचे प्रदाने करण्यात येणार आहे.
या प्रणालीनुसार प्रत्येक आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा सेवार्थ आयडी हा युजर नेम म्हणून वापरावयाचा आहे. त्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचा सेवार्थ आयडी, नाव, पदनाम, ईमेल, मोबाईल क्रमांक अद्यावत करुन जिल्हा स्तरावरील कार्यालयानी संबधित जिल्हा कोषागार कार्यालय व तालुकास्तरावरील कार्यालयानी संबधित उपकोषागार कार्यालयास सादर करावयाची आहे. सर्व माहिती संबधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी अद्यावत करुन बुधवार दि.20 पर्यंत सादर करावी. तसेच ज्या कार्यालयानी माहिती यापुर्वीच सादर केलीत त्यांचे आपले स्तरावर सेवार्थ प्रणाली मध्ये वरील माहिती अद्यावत करुन फेर सादर करावी. विलंब झाल्यास तसेच भविष्यात सीएमपी प्रदानामध्ये अडचणी निर्माण झाल्यास संपुर्ण जबाबदारी संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे.