• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बकरी ईद साजरी करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

City Reporter by City Reporter
July 16, 2021
in अकोला, उत्सव, राज्य
Reading Time: 1 min read
198 2
0
nima arora collector jilhadhikari akola
34
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१६-‘बकरी ईद’ हा सण दि.२१ रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) साजरा होणारअसुन तो अत्‍यंत साधेपणाने साजरी करणे आवश्‍यक असल्‍याचे मार्गदर्शक सुचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. तेव्हा जिल्ह्यात बकरी ईद साजरी करतांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, जिल्‍ह्यात कोविड-१९ च्‍या संसर्गजन्‍य परिस्‍थीतीचा विचार करता मागील वर्षापासून विवीध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्‍सव, सण अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरे करण्‍यात आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका अद्यापही कायम आहे. त्‍यादृष्‍टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येवुन उत्‍सव साजरा करणे उचित होणार नाही. तसेच कोविड-१९ च्‍या डेल्‍टा व्‍हेरिएंट च्‍या प्रार्दुभावामुळे संभाव्‍य परिस्थिती लक्षात घेता संपुर्ण राज्‍यामध्‍ये Level-3 नुसार निर्बंध जारी केले आहेत. यासंदर्भात महाराष्‍ट्र शासनाने निर्गमित केलेल्‍या खालील मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१. संपुर्ण अकोला जिल्‍ह्यात सकाळी सात ते सायंकाळी चार या कालावधीत अत्‍यावश्‍यक तसेच बिगर अत्‍यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्‍यात आले आहेत.

२. प्रत्‍येक शनिवार व रविवार या दिवसी अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर प्रतिष्‍ठाने बंद ठेवण्‍यात आली आहेत.

३. सायंकाळी पाच वाजेपासून दुस-या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी तसेच सकाळी सात वाजेपासुन सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागु करण्‍यात आली असुन सायंकाळी पाच वाजेनंतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करण्‍यास मनाई आहे.

४. आगामी कालावधीमध्‍ये साजरे होणारे सण व उत्‍सव लक्षात घेता कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्टिकोनातुन कलम ३७ (१)(३) लागु करण्‍यात आले आहे.

५. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीमुळे राज्‍यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्‍यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्‍या घरीच अदा करावी.

६. सध्‍या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्‍यास त्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दुरध्‍वनीवरून जनावरे खरेदी करावी.

७. नागरिकांनी शक्‍यतो प्रतिकात्‍मक कुर्बानी करावी.

८. लागु करण्‍यात आलेले Level of Restriction for Breaking the Chain, Dated ०४/०६/२०२१ आणि त्‍यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या सुचनांनूसार इतर निर्बंध कायम राहतील.त्‍यामध्‍ये बकरी ईद निमित्‍त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

९. बकरी ईदच्‍या निमित्‍ताने नागरिकांनी कुठल्‍याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.

१०. कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधित महापलिका, पोलीस, स्‍थानिक प्रशासन व या कार्यालयाने कोरोना संदर्भांने निर्गमित केलेल्‍या विविध आदेशांचे उल्‍लघंन होणार नाही याची दक्षता घेवुन व विहीत केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.तसेच यानंतर व प्रत्‍यक्ष सण सुरू होण्‍याच्‍या मध्‍यल्‍या कालावधीत काही सुचना जारी झाल्‍यास त्‍याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.

Tags: bakri eid
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज,उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही

Next Post

व्हॉट्स ॲप वर आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Whatsapp Features

व्हॉट्स ॲप वर आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

एसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.