अकोला (प्रतिनिधी ): बाळापुर शहरात बाजारपेठ व चौकाचौकात शौचालय उभारावे अशी मागणी अशी मागणी अशोका फाउंडेशनच्या वतीने बाळापूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे बाळापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता व बाळापूर शहरात दर शनिवारी बाजार भरतो या बाजारात आजूबाजूच्या खेड्या गावातील व स्थानीक बरेच लोक बाजारात खरेदी करण्याकरिता गर्दी करतात त्यांना शौचालय नसल्यामुळे या लोकांना व महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागते त्यामुळे बाजारपेठेत व बाळापुर शहरातील चौकात शौचालय व मुत्रीघर उभारण्यात यावे जेणेकरून बाळापूर शहराच्या सौंदर्यात भर पडेल म्हणुन लवकरात लवकर शौचालय उभारण्यात यावे अन्यथा अशोका फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी अशोका फाउंडेशनच्या वतीने बाळापूर नगरपालिका मुख्याधिकारी श्री गोपीचंद पवार साहेब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी माजी पोलीस निरीक्षक प्रजा अहिर मॅडम, ज्योती अग्रवाल जागो ग्राहक जागो अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता उमेशभाऊ इंगळे ,डी एस बी ग्रुप बाळापुर प्रमोद डंबेलकर ,एडवोकेट पंजाबराव तिडके,रिजवान कुरेशी ,अफजल पैलवा,मनीष तायडे, पंकज खवणे, रत्नदीप तिडके ,आतिश डंबेलकर , राहूल निंबाळकर, महेश तायडे ,अनुराग तायडे, राज तायडे ,शुभम उपरवार,सौरभ वानखडे आदी अशोका फाउंडेशनचे पदाधिकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते