तळेगाव बाजार: येथील रहिवासी शिवाजी गणेश मापे वय 40 व त्याचा भाऊ हरिदास गणेश मापे वय 35 या दोघा भावा मधे बाचाबाची होऊन या वादात लहान भाऊ हरिदास गणेश मापे याने चाकुने शिवाजी गणेश मापे यांचे छातिवर चाकुने सपासप वार करून दि 15 जुले रोजि रात्री वार केले.
कुणिहि मधात येव नये म्हणून हरिदास चाकु घेऊन उभा होता व कोणीही मधात आलें तर खुपसून देईन असे धमकावत होता. त्यामुळे कुणिही मधे गेले नाही गावातील नागरिकांनी हिवरखेड पोलिस स्टेशन मध्ये माहिती देण्यासाठी फोन केला असता तळेगाव येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले संशयित आरोपी आपल्या पत्नीला व मुलांना घेऊन मोटरसायकल ने जात असताना गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली भांडणाचे मुळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.