इंधनाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे, भाजपा सरकारने तेल काढणे बंद करावे. आपल्या उद्योगपती मित्रांना करामधून सूट देण्यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्यांना त्रास देणे बंद करावे.
आज तेल्हारा शहर तथा तालुका काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस तसेच सेवा दलच्या वतीने तेल्हारा शहरातून काँग्रेसजनांचा सायकल मार्च आज काढण्यात आला.
सर्वसामान्य जनतेला मोटारसायकल हे साधन परवडण्यासारखे होते, पण आज १०८ रुपये पेट्रोल आणि १०० रुपये डिझेल आपल्या देशात मिळत आहे.
६० वर्षांचा हिशोब मागणारे भाजप आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी जनतेला ७ वर्षात सायकलवर आणून ठेवले.
!!जनता तुम्हाला माफ करणार नाही!! अशे घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रकाश वाकोडे ता अद्यक्ष तेल्हारा, डॉ अशोक बिहाडे, जिल्हा सचिव, सोनू मलीये शहर अद्यक्ष मा ता अद्यक्ष प्रशांत देशमुख, अतुल ढोले रजिया पटेल, महिला ता अद्यक्ष सुशील भोंगे शहर अद्यक्ष प्रकाश राऊत ,रामेश्वर भोंगळे, गजानन वाघमारे वी बी देशमुख, अनंत सोनमाळे, नितिन वाकोडे, मंगेश दुतोंडे, आशु बलोदे, शुभम सोनोने, सचिन पोहरकर,अन्सार पटेल, अब्बू कुरेशी, मनोज डांगे,मुरली तिवंर, प्रशांत पोहरकर मंगेश पोहरकर उपस्थित होते