अकोला- पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात बाळापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले संपुर्ण जिल्ह्यात स्वाक्षरी अभियान राबवले जात असून सह्यांचे निवेदन करून केंद्र सरकार विरोधात राष्ट्रपती महोदयांना दिले जाणार आहे .यापूर्वीही बाळापूर विधानसभा युवक काँग्रेसने विविध आंदोलने केली असून सरकारने भाववाढ कमी करावी अशी जोरदार आग्रही मागणी केली आहे . स्थानिक बस स्थानक व पेट्रोल पंपावर हे अभियान सुरू आहे .युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.सदर अभियान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार प्रदेश सचिव निनाद मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा महासचिव शुभम तिडके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.तसेच कार्यक्रमाला प्रामुख्याने काँग्रेस नेते प्रमोद डंबेलकर, जयराम सोनवणे, बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद इकबाल इरफान ठेकेदार, रिजवान खुरेशी, खान शाहरुख मनीष तायडे ,बलवंत गोपनारायण, शेख सोहेल ,आशिक भाई शेख साऊथ अखिल सर , मुजाहिद सर , सौरव वानखडे, राज तायडे ,भीमा वानखेडे ,अनुराग तायडे व बाळापूर विधानसभा युवक पदाधिकारी उपस्थित होते.