अकोट(प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने शेतीसह अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.अकोट तालुक्यातील वरूळ जवुलका येथील नदीला पूर आल्याने या परिसरातील घरांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.