• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जागतिक लोकसंख्या दिन: आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान; प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी सज्जता- जिल्हाधिकारी पापळकर

Team by Team
July 12, 2021
in अकोला, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
82 1
0
जागतिक लोकसंख्या दिन: आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान; प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी सज्जता- जिल्हाधिकारी पापळकर
23
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.११-  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करुन आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे  परिस्थिती हाताळली. आज दुसऱ्या लाटेमुळे निर्माण संसर्गाची स्थिती आपण नियंत्रणात आणू शकलो आहोत ते केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे. असे असले तरी आता आपल्याला तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता करतांना ती प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवून करायची आहे, अशा शब्दात आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. कोविड काळातही शासनाच्या कुटूंब कल्याण योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कोविड योद्धे म्हणून सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनाही गौरविण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कस्तुरबा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पतिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, उपअधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.श्याम शिरसाम, डॉ.आरती कुलवाल, डॉ.दिनेश नैताम, डॉ.संगीता साने, डॉ.पटोकार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले यांनी केले. त्यात त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व त्याअनुषंगाने कुटुंब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्व विषद केले.

आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवितांना ग्रामीण स्तरावर समुपदेशन अधिक महत्त्वाचे असून त्यासाठी शासनाचे आरोग्य कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावतात.

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून प्राथमिक आरोग्य स्तरावरील यंत्रणा सक्षम करणे हे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. त्यादृष्टीने काम सुरु झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्य्या लाटेत फार मोठं काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं, त्यांनी सक्षमपणे काम केलं म्हणून कोविडचा मुकाबला करता आला. आता स्थिती सुधारत असली तरी उसंत न घेता तिसऱ्या लाटे साठी सज्जता करावी लागेल. प्रशासनाने त्यासाठीची पूर्व तयारी सुरू केली आहे. या  पूर्वतयारीचा भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सज्जता करण्यात येत आहे. ग्रामिण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही सज्जता करतांनाच कोविड लसीकरण अधिकाधिक लोकांचे करून घ्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी निवडक कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कोविड निर्बंधांमुळे जादा व्यक्तिंना पाचारण करण्यात आले नव्हते. त्यासाठी आता प्रत्येक तालुका व आरोग्य केंद्र स्तरावरही कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे,असे संयोजकांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश गवळी, सूत्रसंचालन सचिन उनवणे यांनी केले.

Tags: akola newsWorld population world
Previous Post

तेल्हारा तालुका कॉग्रेस च्या वतीने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम

Next Post

पत्नी पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून छळ करण्यास केले प्रवृत्त, आध्यामिक गुरू अटकेत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime news

पत्नी पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून छळ करण्यास केले प्रवृत्त, आध्यामिक गुरू अटकेत

विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पाला केंद्राकडून ब्रेक!

विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पाला केंद्राकडून ब्रेक!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.