तेल्हारा (प्रतिनिधी): केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात तेल्हारा तालुका काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व सर्व सेल द्वारा आयोजित राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवली.
या मोहिमेत तालुक्यातील शेकडो नागरीकांनी केवलराम पेट्रोल पंप तेल्हारा येथे स्वाक्षरी करुन केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला.
यावेळी सोनु मलिये अनंत सोनमाळे संदिप देशमुख अन्सार पटेल अब्बू भाई कुरेशी ज्ञानेश्वर ताथोड श्रीकांत बिहाडे आशुतोष बलोदे मंगेश दुतोंडे सचिन पोहरकार मयुर शेगोकार तालुक्यातील समस्त पदाधिकारी उपस्थित होते.