अकोला(प्रतिनिधी)- लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल माणिकराव गावंडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना.बच्चुभाऊ कडु यांच्या जन्मदिनी अनिल गावंडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी बच्चुभाऊ कडु यांनी अनिल गावंडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली अनिल गावंडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती होताच तेल्हारा येथे कार्यकर्ते उत्साही झाले होते.अनिल गावंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे आगमन अकोला जिल्ह्यात झाले असता प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच लोकजागर मंचच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले तेल्हारा येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तसे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी अकोल्यासह तेल्हारा तालुक्यातील तसेच अकोट तालुक्यातील अनेक गावांतील प्रहार जनशक्ती पक्षाचे तसेच लोकजागर मंचाचे पदाधिकारी यांनी विविध गावांमध्ये स्वागत केले.यावेळी प्रहार लोकजागर मंचाचे शेकडो कार्यकते उपस्थित होते.