अकोला- आज दि.9 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३८२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३७६ अहवाल निगेटीव्ह तर सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57672(43116+14379+177)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सहा+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन = एकूण पॉझिटीव्ह-आठ.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९६८५९ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९३३४१ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१२१ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९६८२८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५३७१२ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
सहा पॉझिटिव्ह
आज दि.9 दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट- एक, तेल्हारा- एक, अकोला मनपा क्षेत्र-चार दरम्यान काल (दि.८) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
६९ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दि.9 दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथील एक, बिहाडे हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६६असे एकूण ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
४३ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57672(43116+14379+177) आहे. त्यात ११३० मृत झाले आहेत. तर ५६४९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.