दानापूर(सुनिलकुमार धुरडे)-शासन वेळोवेळो जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी या करिता विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते . जिल्हा परिषद अकोला शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सण 2020 ते 2021 या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या वाढावी या करिता शाळेला बक्षिस सुद्धा ठेवण्यात आले होते. यामध्ये अनुक्रमे तालुका स्तरावर प्रथम ,दुत्तीय, व तृतीय क्रमांक येणाऱ्या शाळांना बक्षिसे देणात आले आहेत .यामध्ये सण 2020 व 2021 या सत्रात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढली त्या शाळेच्या खात्यात बक्षीस रक्कम वर्ग करण्यात आली आहे अधिकृत पत्र मिळाले असून, यामध्ये या स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथिल जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा(मुले) या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून या शाळेच्या खात्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम 15,000 हजार रुपये वर्ग करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सदर वर्ग करण्यात आलेली रक्कम ही शाळेला लागणारे शैक्षणिक साहित्य, शाळेची गुणवत्ता, शाळेची पतसंख्या वाढावी या करिता खर्च केल्या जाईल असे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री, विश्वेश्वर पातूर्डे यांनी सांगितले.दानापूर येथिल जिल्हा परिषद शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला, जिल्हाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला, तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी पालक, गावकरी यांचे अभिनंदन केले आहे.