अकोला(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात केल्या गेले अनुकरण. मागील काही महिन्यांपासून अकोला शहर वाहतूक शाखेने त्यांचे दैनंदिन कामा व्यतिरिक्त अकोल्यातील बेताल वाहतूक, निर्मानधीन रस्ते, मूलभूत सुविधांचा अभाव असतांनाही शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतूक सांभाळत असतांनाच वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम व मोहिमा राबविल्या ज्या मध्ये सुरवातीला अचानक कडक लॉक डाऊन संपूर्ण भारतात लागू झाल्या नंतर बऱ्याच जेष्ठ नागरिकांचे आप्तस्वकीय बाहेर राज्यात किंवा बाहेर जिल्ह्यात अडकून पडल्या नंतर एकटे पडलेल्या जेष्ठ नागरिकां साठी शहर वाहतूक शाखेने ” एक कॉल करा, मदत मिळवा” ही मोहीम सुरू करून अनेक जेष्ठ नागरिकांना मदत केली.
लॉक डाऊन मुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारे आजारी व जेष्ठ ऑटो चालक ह्यांची उपासमार होत असतांना, सामाजिक संस्थांची मदत घेऊन अश्या ऑटो चालकांना एक महिना पुरेल असे राशन पुरविले, ऑक्टोबर 2020 मध्ये करोना प्रादुर्भाव वाढल्या नंतर सर्वसामान्य नागरिक व ऑटो चालक ह्यांचे मध्ये मास्क घालण्या संभधानें जनजागृती व्हावी म्हणून अकोला शहरात ” नो मास्क नो सवारी” ही मोहीम राबवून शहरातील 5000 ऑटोवर ह्या संभधानें मोठे स्पष्ट दिसणारे स्टिकर चिपकवून जे ऑटो चालक स्वतः मास्क घालणार नाही व विना मास्क सवारी बसवतील त्यांचेवर कारवाईचा बडगा उगारला त्या मुळे विना मास्क कोणीही ऑटो चालक दिसत नव्हता, ह्या मोहिमेची दखल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी घेऊन, अश्या प्रकारची मोहीम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
अकोला शहर वाहतूक शाखेचा हा उपक्रम त्या नंतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात सुरू झाला, करोना योध्याचे सन्मानार्थ घेतलेली वॉल पेंटिंग स्पर्धा असो की हेल्मेट सक्ती, विनाकागद पत्रे वाहन जप्तीची मोहीम असो शहर वाहतूक शाखेच्या मोहिमेचा कित्ता इतर जिल्ह्यांनी गिरवल्याचे दिसून आले, त्याच बरोबर शासनाचे आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रात सर्वात प्रथम घेतलेले रक्तदान शिबिर असो की अपघात कमी करण्यासाठी घेतलेले ऑटो चालकां साठी चे नेत्र चिकित्सा शिबिर असो ह्या मोहिमेचे तत्कालीन गृहमंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुकच केले.
शहर वाहतूक शाखेची सर्वात गाजलेली व संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर बाहेर राज्यात सुद्धा अनुकरण केलेली मोहीम म्हणजे बुलेट चे फटाके फोडणारे डुप्लिकेट सायलेन्सर जप्त करून वाहन चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून जप्त केलेले डुप्लिकेट सायलेन्सर न्यायालयाचा आदेश घेऊन रोडरोलर खाली चिरडून नष्ट करणे, ह्या मोहिमेत शहरातील धनदांडग्या व राजकीय वरदहस्त असलेल्या बुलेट चालकांची वाहने शहर वाहतूक शाखेत लावून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून मूळ सायलेन्सर लावून घेऊन नंतरच बुलेट सोडण्यात आल्या, ह्या मोहिमेचा कित्ता नंतर अनेक जिल्ह्यांनी गिरविला.
अकोला शहर वाहतूक शाखेने वाहतूक शाखेच्या इतिहासातील सर्वात जास्त जम्बो दंडात्मक कारवाया तर केल्याचं परंतु वेगवेगळ्या जनसामान्यांच्या उपयोगाच्या मोहिमा राबवून आपला स्वतः चा एक अकोला पॅटर्न तयार केला.