अकोला– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात सहभागासाठी १५ जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, तरी या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत यांनी केले आहे.
या योजनेतील सहभागासाठी आता मुदत वाढ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी त्वरेने सहभागी व्हावे. अधिसुचित क्षेत्रात तसेच भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावयाचा नसल्यास त्यांनी त्याबाबतचे घोषणापत्र बॅंकेला देणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी व्हावयाचे असल्यास जवळच्या आपलेसेवा केंद्र वा बॅंकेतून सहभाग घेता येईल.
अकोला जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२१ साठी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्श्युरन्स कं. लि. मुंबई या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीचे संपर्क तपशील याप्रमाणे- एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्श्युरन्स कं. लि., पहिला मजला, एचडीएफसी हाऊस, १६५-१६६, एच.टी.पारेख मार्ग, चर्चगेट मुंबई-४०००२० दूरध्वनी-०२२-६२३४६२३४, ग्राहकसेवा क्रमांक १८००२६६०७००, इ-मेल-[email protected]
या कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी व त्यांचे संपर्क क्रमांक या प्रमाणे-
जिल्हा प्रतिनिधी- दिलीप सेन (८८२८००२४६०), शुभम हरणे(८०८७९०३१७१), अकोला तालुका- अभिषेक रानडे (८२३७४६१०४०), बार्शीटाकळी तालुका-नरेंद्र बहाकर(९७६६५५८५६१), मुर्तिजापूर तालुका- सचिन जायले(८९८३०३६६४०), अकोट तालुका- सुजय निपाने (७०५७५०२८७०), तेल्हारा तालुका- प्रफुल्ल मानकर (९६८९७६१५१२), पातुर तालुका- धीरज कोहर(९५५२६२४९६६). बाळापूर तालुका-अमोल टाके (९७६६५८३२५६)
समाविष्ट पीक, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता याप्रमाणे-
खरीप ज्वारी, विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टरी रुपये) २५ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ५०० रुपये.
सोयाबीन- ४५ हजार रुपये, ९०० रुपये, मुग- १९ हजार रुपये, ३८० रुपये, उडीद- १९ हजार रुप्ये, ३८० रुपये, तूर ३१५०० रुपये, ६३० रुपये, कापूस ४३ हजार रुपये २१५० रुपये या प्रमाणे. ही पिके सर्व तालुक्यांसाठी अधिसूचित आहेत.
तरी शेतकऱ्यांनी १५ जुलै पूर्वी आपले अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.