अकोला– आज दि.5 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १३९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३७ अहवाल निगेटीव्ह तर दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.४) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57637(43095+14365+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी पाच = एकूण पॉझिटीव्ह-सात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९५१७४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९१६७३ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१०४ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९५११२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५२०१७ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दोन पॉझिटिव्ह
आज दि.5 दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीचे दोन अहवाल पॉझिटीव्ह आले. आज दिवसभरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. त्यात अकोला-दोन. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-एक). दरम्यान काल (दि.४) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज दि.5 एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तेल्हारा येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
२० जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, तर होम आयसोलेशन मधील १७ असे एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
२३१ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57637(43095+14365+177) आहे. त्यात ११२९ मृत झाले आहेत. तर ५६२७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २३१ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.