तेल्हारा (प्रा. विकास दामोदर ) – सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांच्या वतीने बेलखेड येथे कन्या समृद्धी योजनांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा मध्ये बेलखेड येथील रहिवासी अतुल ब्रह्मदेव जाधव यांच्या मुलगी कु, अनुश्री जाधवच्या नावाने दहा वृक्ष देण्यात आले यामध्ये सागवान व आंबा अशा प्रकारचे वृक्ष आहेत सामाजिक वनीकरन ने दिलेल्या वृक्षाणा बेलखेड येथील रहिवासी अतुल ब्रह्मदेव जाधव यांनी स्वीकारले व या वृक्षाणा संगोपन करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली या कार्यक्रमामध्ये उपस्थित सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस,डी, चिलकर , वनरक्षक एस ,जे,पाथरकर, वृक्षप्रेमी गजानन राठोड, बेलखेड येथील उपसरपंच श्री नंदकिशोर शामराव निमकर्डे, श्री सोनटक्के ,श्री अतुल ब्रह्मदेव जाधव, सौ पूजा अतुल जाधव, यांची कन्या कु समृद्धी अतुल जाधव, छोटू तायडे, प्रभाकर पवार, सुरज साळुंके, पंकज सोनोने, अनंत कुमार मुरकुटे इत्यादी उपस्थिती होती