अकोला– आज दि.2 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 386 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 378 अहवाल निगेटीव्ह तर आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57608(43083+14348+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर आठ+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह-नऊ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 294103 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 290613 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3093 नमुने होते. आजपर्यंत एकूण 294045 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 250962 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आठ पॉझिटिव्ह
आज दि.2 दिवसभरात आठ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बाळापूर- एक, मुर्तिजापूर-एक, बार्शीटाकळी- दोन, तेल्हारा-एक, अकोला-तीन (अकोला ग्रामीण-दोन, अकोला मनपा क्षेत्र- एक), दरम्यान काल (दि.1) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
69 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 60 असे एकूण 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
293 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57608(43083+14348+177) आहे. त्यात 1128 मृत झाले आहेत. तर 56187 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 293 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.