अकोला – कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले. आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करुन महसूल व विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘एक कर्मचारी, एक वृक्ष’ मोहिमअंतर्गत वृक्षरोपण करुन त्यांचे सवर्धंन करण्याचे आवाहन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, सुचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी जिल्हाधिकारी परिसरात वृक्षारोपण केले. तसेच महसूल व विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: वृक्ष आणून वृक्षारोपण केले