उद्या १ जुलैपासून भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांसाठी नवा दणका देण्याची तयारी केली आहे. आता एसबीआयच्या ग्राहकांना एटीएमवरुन पैसे काढणे आणि चेकद्वारे पैसे काढण्यासाठी सेवा शुल्क भरावे लागणार आहे. हे चार्जेस सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदारांना हे लागू असतील. हे नियम १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहेत.
एटीएमवरुन फक्त चारवेळा पैसे काढण्याठी कोणतेच चार्जेस नसतील. जर चारपेक्षा जास्त पैसे काढल्यास चार्जेस आकारले जाणार आहेत. ग्राहकांनी चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढले तर १५ रुपयांसह जीएसटी आकारला जाणार आहे. एसबीआयच्या एटीएम व्यतिरिक्त इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठीही हेच शुल्क लागू आहेत.
एसबीआय सुधारित चेक बुक वापर शुल्क
स्टेट बँक ऑफ इंडिया आर्थिक वर्षामध्ये पहिले १० चेक विनामूल्य प्रदान करेल. त्यापलीकडे शुल्क खालीलप्रमाणे असेल-
१०-पानांचे चेक बुक रु. ४० / – + जीएसटी
२५-पानांचे चेक बुक रु. ७५ / – + जीएसटी
इमरजंन्सी चेक बुक: रु. ५० / – + १० पाने किंवा त्यावरील भागासाठी जीएसटी
आयटीआर न भरणाऱ्यांसाठी टीडीएस जास्त आकारला जाणार
गेल्या दोन वर्षांपासून आयटीआर न भरणाऱ्या ग्राहकांसाठी टीडीएस वर जास्त कर आकारण्याची भारत सरकारची तयारी आहे. हा नियम ज्या करदात्यांचा टीडीएस दर वर्षी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त कपात करतात अशा करदात्यांना लागू होईल.