अकोला– समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयाचे कल्याण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या समितीमध्ये तृतीयपंथीयासाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थेतील दोन तृतीयपंथीयांची नियुक्ती करावयाची आहे. त्यापैकी एक ट्रान्सजेंडर(ट्रान्सवुमन) असणे आवश्यक आहे. तसेच समितीमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करावयाची आहे. दोन्ही समितीकरीता इच्छुक पात्र संस्थाव्दारे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीमार्फत प्रस्ताव मागविण्यात येत असून त्याची परिपूर्ण प्रस्ताव समाजकल्याण विभागात दि. 15 जुलै 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.