अकोला – जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृतीवेतनधारकांचे माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन देयक तयार करत असताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन विलंबाने दि. 5 जुलै पर्यंत होणे अपेक्षित आहे. तरी राज्य शासकीय निवृतीवेतन धारकांनी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे.